पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत गदारोळ करणारे विरोधी पक्षातील १२ खासदार हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित !

गदारोळ करून सभागृहाचे कामकाज होऊ न देणार्‍या कोणत्याही सदस्याकडून जनतेच्या पैशांची झालेली हानीही भरून घेतली पाहिजे, असेच जनतेला वाटते !

काशी विश्‍वनाथ मार्गाच्या उद्घाटनाला २५ सहस्र साधू, संत, महंत आणि धर्माचार्य यांना आमंत्रित करणार !

संतांसह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, २०० शहरांचे महापौर आदीही या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन केले जाणार आहे.

‘जिओ प्रिपेड’च्या ‘रिचार्ज’ दरात १ डिसेंबरपासून वाढ !

‘एअरटेल’ आणि ‘व्होडाफोन-आयडिया’ या आस्थापनांनंतर आता ‘जिओ’ आस्थापनानेही त्याच्या ‘प्रिपेड’च्या ‘रिचार्ज’च्या दरात १ डिसेंबरपासून वाढ करण्याची घोषणा केली आहे.

तुर्कस्तानने उत्तर सीरियामध्ये वितरित केलेल्या पुस्तकातील महंमद पैगंबर यांच्या चित्रामुळे संतप्त नागरिकांकडून पुस्तकाची जाळपोळ !

‘जर हे पुस्तक मागे घेण्यात आले नाही, तर निदर्शने करण्यात येतील’, अशी चेतावणी स्थानिकांनी दिली आहे.

देहली येथे ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने

एका गोदामाचे प्रार्थना स्थळात रूपांतर करून तेथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तेथे आंदोलन केले.

दरभंगा (बिहार) येथील सरकारी आयुर्वेद रुग्णालयामध्ये प्रथमच कुंडली पाहून उपचार करणारा बाह्य रुग्ण विभाग चालू !

भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन अशा पद्धतीने होणे हे अभिनंदनीय आहे ! आता देशातील अन्य रुग्णालयांमध्येही असा विभाग चालू व्हावा !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही देशातून जातीवाद संपलेला नाही ! – सर्वोच्च न्यायालय

जे देशात दिसून येते, तेच न्यायालयाने सांगितले आहे. या स्थितीला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत !

अररिया (बिहार) येथील जिल्हा न्यायालयाकडून एकाच दिवसांत सुनावणी करून बलात्कार्‍याला जन्मठेपेची शिक्षा !

न्यायालयांनी अशा प्रकारे गतीशील कामकाज करावे, असेच जनतेला वाटते !

संसदेत तीनही कृषी कायदे रहित

सभागृहात गदारोळ करणे, म्हणजे जनतेचा वेळ आणि पैसा यांचा अपव्यय करणे होय ! जनतेची झालेली ही हानी अशांकडूनच वसूल केली पाहिजे !

भारतीय संस्कृतीविषयी द्वेष असणार्‍या मुसलमानांनी पाकिस्तानात निघून जावे ! – महामंडलेश्‍वर यतींद्रानंद गिरि, जुना आखाडा

भारतात रहाणार्‍या मुसलमानांमध्ये भारतीय संस्कृती आणि भारताचे सरकार यांच्या प्रती द्वेष आहे. ते येथील सर्व सुविधांचा उपभोग घेतात आणि भारतीय संस्कृती अन् सरकार यांना शिव्या देतात.