देहली येथे ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंच्या होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने

हिंदु जनजागृती समितीचाही सहभाग

(टीप : ‘चंगाई’ म्हणजे पाद्रयांकडून आजारी असणार्‍यांवर प्रार्थनेद्वारे उपचार करून त्यांना कथितरित्या बरे करणे)

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – येथील द्वारका भागातील मटियाला गावातील एका गोदामाचे प्रार्थना स्थळात रूपांतर करून तेथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून ‘चंगाई सभे’द्वारे हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तेथे आंदोलन केले.

आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते

यासह येथे हनुमान चालिसाचे पठणही करण्यात आले. या आंदोलनामध्ये विश्‍व हिंदु परिषद, बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते, तसेच स्थानिक हिंदू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात महिलांचाही समावेश होता. या आंदोलनामुळे येथे प्रार्थनेसाठी आलेले हिंदू तेथून निघून केले. या प्रार्थनास्थळात चंगाई सभेच्या माध्यमांतून आजार बरे करण्याच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्यात येत होते.


हे पण वाचा – पंजाब येथे हिंदू आणि शीख यांच्या विरोधामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या ‘चंगाई सभे’त जाण्याचे टाळले !


हे गोदाम ख्रिस्ती मिशनर्‍यांनी प्रती महिना ३ लाख रुपये भाडेतत्वावर घेतले होते. या आंदोलनानंतर गोदामाच्या मूळ मालकाने मिशनर्‍यांकडून गोदाम परत स्वतःच्या कह्यात घेत ख्रिस्ती मिशनर्‍यांना तेथून निघून जाण्यास सांगितले.