स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही देशातून जातीवाद संपलेला नाही ! – सर्वोच्च न्यायालय

जे देशात दिसून येते, तेच न्यायालयाने सांगितले आहे. या स्थितीला आतापर्यंतचे सर्वपक्षीय शासनकर्तेच उत्तरदायी आहेत ! – संपादक 

नवी देहली – देशामध्ये जातीवरून होणार्‍या हिंसेच्या घटना हेच सांगतात की, स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही देशातून जातीवाद अद्याप संपलेला नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणावर निकाल देतांना व्यक्त केले.

वर्ष १९९१ मध्ये जातीवरून झालेल्या हत्येच्या प्रकरणावर निकाल देतांना न्यायालयाने म्हटले की, यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत. त्याचे तात्काळ पालन केले पाहिजे. (सर्वोच्च न्यायालयाने निर्देश देऊनही त्याचे पालन होत नसेल, तर या देशात कायदा आणि सुव्यवस्था कशी रहाणार ? निर्देशांचे पालन न करणारे संबंधित सर्वपक्षांचे शासनकर्ते, प्रशासन आणि पोलीस यांना न्यायालयाने शिक्षा करावी, असेच जनतेला वाटते ! – संपादक)