चीनची भिंत हीच त्याची मूळ सीमा, तर उर्वरित चीन हा विस्तारवाद ! – डॉ. इंद्रेश कुमार, प्रचारक, रा.स्व. संघ
चीनची वास्तविक सीमा चीनची भिंत आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही चीनचे सध्याचे क्षेत्रफळ आहे, तो चीनचा विस्तारवाद आहे, असे प्रतिपादन रा.स्व. संघाचे प्रचारक डॉ. इंद्रेश कुमार यांनी येथे राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचकडून आयोजित केलेल्या एका संमेलनात केले.