पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत गदारोळ करणारे विरोधी पक्षातील १२ खासदार हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित !

गदारोळ करून सभागृहाचे कामकाज होऊ न देणार्‍या कोणत्याही सदस्याकडून जनतेच्या पैशांची झालेली हानीही भरून घेतली पाहिजे, असेच जनतेला वाटते ! – संपादक

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – संसदेच्या ऑगस्ट मासात झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या गदारोळावरून विरोधी पक्षांच्या १२ खासदारांना सध्याचे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये काँग्रेसचे ६, तृणमूल काँग्रेस, माकप आणि शिवसेना यांच्या प्रत्येकी २ खासदारांचा समावेश आहे. यामध्ये शिवसेनेचे अनिल देसाई आणि प्रियांका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. सभागृहामध्ये गैरवर्तवणूक करून कामकाजात अडथळा आणल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.