‘जिओ प्रिपेड’च्या ‘रिचार्ज’ दरात १ डिसेंबरपासून वाढ !

मुंबई – ‘एअरटेल’ आणि ‘व्होडाफोन-आयडिया’ या आस्थापनांनंतर आता ‘जिओ’ आस्थापनानेही त्याच्या ‘प्रिपेड’च्या ‘रिचार्ज’च्या दरात १ डिसेंबरपासून वाढ करण्याची घोषणा केली आहे. ‘जिओ’ने ३१ रुपयांपासून ते ४८० रुपयांपर्यंतच्या ‘रिचार्ज’चे दर वाढवले आहेत. ही दरवाढ २० टक्के इतकी आहे.

(वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करावे)

१. जिओचे २८ दिवसांची वैधता असलेले १२९ रुपये, १९९ रुपये आणि २४९ रुपयांचे रिजार्च आता अनुक्रमे १५५ रुपये, २३९ रुपये आणि २९९ रुपयांना मिळणार आहे.

२. यासह ८४ दिवसांची वैधता असलेले ३२९ रुपये, ५५५ रुपये आणि ५९९ रुपयांचे रिचार्ज आता अनुक्रमे ३९५ रुपये, ६६६ रुपये आणि ७१९ रुपयांना मिळणार आहे.

३. एक वर्ष वैधता असलेल्या प्लॅनमध्ये सर्वाधिक वाढ झाली असून २ सहस्र ३९९ रुपयांना मिळणारा रिचार्ज आता २ सहस्र ८७९ रुपयांना मिळेल.

‘जिओ’च्या ‘डाटा अ‍ॅड ऑन प्लॅन’च्या दरातही वाढ !

‘जिओ’च्या ‘डाटा अ‍ॅड ऑन प्लॅन’चे दरही वाढले आहेत. पूर्वी ६ जीबी डेटाचा ५१ रुपयांना मिळणारा रिचार्ज आता ६१ रुपयांना, तर १२ जीबी डेटाचा आतापर्यंत १०१ रुपयांना मिळणारा रिचार्ज १ डिसेंबरपासून १२१ रुपयांना मिळणार आहे. यासह ५० जीबी डेटाचा रिचार्ज ५० रुपयांनी महाग झाला असून, त्यासाठी ३०१ रुपये मोजावे लागणार आहेत.