पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित !

संसदेच्या पहिल्याच दिवशी गदारोळ घालणार्‍यांना अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी निलंबित केले पाहिजे म्हणजे संसदेचे कामकाज शांतपणे चालू राहील !

मुंबईत भर रस्त्यात अधिवक्त्यावर काठी आणि तलवारी यांच्या साहाय्याने प्राणघातक आक्रमण !

लोकहो, पोलीस आणि प्रशासन रक्षण करील, या भ्रमात न रहाता, स्वत:च्या आणि आप्तांच्या रक्षणासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या !

बकरी ईदसाठी कोरोना नियम शिथिल करण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने केरळमधील साम्यवादी सरकारकडे मागितले उत्तर !

केरळमधील साम्यवादी आघाडी सरकार मुसलमानांना खुश करण्यासाठी लोकांच्या जिवाशी खेळून कोरोना नियमांत सूट देत आहे, हे उघड आहे.

पंढरपूरच्या पायी वारीला अनुमती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

कोरोनामुळे गेल्या वर्षी पंढरपूरची पायी वारी रहित करण्यात आली होती. यंदाही राज्यशासनाने पायी वारीला अनुमती दिलेली नाही; मात्र प्रमुख १० दिंड्यांना बसद्वारे जाण्याची अनुमती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात भगव्या झेंड्याचा अपमान चालू असून वारकर्‍यांच्या पताका, टाळ, चिपळ्या काढून घेतल्या जातात ! – ह.भ.प. संतवीर बंडातात्या कराडकर

ते मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही दडपशाहीने महाराष्ट्रातील पायीवारी सोहळे रहित केले. त्यामुळे तुमची पूजा पांडुरंग स्वीकारेल, असे वाटत नाही.

देशात वर्ष २०१४ ते २०१९ या काळात देशद्रोह्याच्या एकूण ३२६ गुन्ह्यांत केवळ ६ जणांनाच शिक्षा ! – केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती

देशात गुन्हेगारांना अनेक वर्षांनंतरही शिक्षा होणार नसेल, तर गुन्हेगारी कधीतरी न्यून होईल का ? ही स्थिती आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

पाकमध्ये वयाची १८ वर्षे होण्यापूर्वी धर्म पालटण्यावर बंदी आणण्याच्या प्रस्तावाला एका मंत्र्याकडून विरोध

पाकमधील सिंध प्रांतामध्ये हिंदूंची संख्या अधिक आहे. या ठिकाणी धर्मांतर होण्याच्या घटना पुनःपुन्हा घडत आहेत. त्यामुळेच गेली कित्येक वर्षे हे सूत्र प्रलंबित ठेवण्यात आले आहे.

अररिया (बिहार) येथील एका शाळेच्या धर्मांध मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

‘विठाई’ बसवरील श्री विठ्ठलाचे चित्र बसच्या आतील बाजूने लावण्यात यावे ! – राष्ट्रीय वारकरी परिषदेची परिवहनमंत्र्यांकडे मागणी

श्री विठ्ठलाची विटंबना रोखण्यासाठी बसच्या बाहेरील भागात असलेले विठुरायाचे चित्र बसच्या आतील बाजूला लावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे.

चाकण (पुणे) येथे २ युवकांच्या मृत्यूप्रकरणी ९ जणांवर गुन्हा नोंद

गरम लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण करून २ युवकांची हत्या केल्याप्रकरणी ९ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.