पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणार्‍या स्त्रियांमुळे देशाची झालेली दुर्दशा !

आज मुलींना बालपणापासून हिंदु संस्कृतीचे महत्त्व शिकवले जात नसल्याने मुली आणि स्त्रिया यांच्याकडून धर्माचरण केले जात नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये असलेले देवीतत्त्व आणि चैतन्य यांचा र्‍हास होऊ लागला आहे.

जम्मू-काश्मीरमधील १४९ वर्षे जुनी ‘दरबार मूव्ह’ प्रथा रहित !

गेल्या ७४ वर्षांत प्रतिवर्षी शेकडो कोटी रुपयांचा व्यय रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काढण्याचे प्रयत्न कोणत्याही शासनकर्त्याने केले नाहीत, हे लज्जास्पद !

चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला हे ‘सत्यनारायण की कथा’ या नावाने प्रेमकथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार !

साजिद नाडियाडवाला हे प्रेमकथेवर आधारित चित्रपटाला स्वतःच्या श्रद्धास्थानाचे नाव देण्याचे धाडस दाखवले असते का ? हिंदू सहिष्णु असल्यामुळेच ऊठसूठ कुणीही उठतो आणि हिंदु धर्म, धर्मग्रंथ, संत, महापुरुष यांचे विडंबन करतो.

आरोपी मोहन नायक यांच्या जामिनावर पूर्वीच्या आदेशावरून प्रभावित न होता निर्णय घ्या !

बेंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणातील ६ वे आरोपी मोहन नायक यांच्यावरील ‘ककोका’ गुन्हा रहित करण्याचा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता. त्याला गौरी लंकेश यांची बहीण कविता लंकेश यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.

५ लाख रुपयांची लाच घेतांना कर्णावती (गुजरात) येथील ईडीच्या २ अधिकार्‍यांना अटक

भ्रष्टाचार्‍यांवर कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या ईडीचेच अधिकारी भ्रष्टाचारी आहेत, यावरून सर्वच अन्वेषण यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत, हे लक्षात येते ! ही स्थिती केवळ हिंदु राष्ट्रातच पालटता येऊ शकते !

काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांचे ८ लाख ६७ सहस्र रुपयांचे वीज देयक प्रलंबित !

पंजाबमध्ये काँग्रेसचेच सरकार असल्याने त्यांच्या नेत्यांना वीज फुकट देण्यात येते, असे समजायचे का ? मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पहाणार्‍या सिद्धू यांच्या घराच्या विजेची जोडणी तोडण्याचे धाडस मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे सरकार दाखवणार का ?

पुष्कर सिंह धामी होणार नवीन मुख्यमंत्री !

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. रावत हे केवळ ४ मासांसाठीच मुख्यमंत्री ठरले.

चीनकडून उइगर मुसलमानांविरुद्ध वापरल्या जाणार्‍या दमनतंत्राचे पाककडून समर्थन !

पाकला हीच भाषा समजते, हे भारतीय शासनकर्ते आतातरी लक्षात घेतील का ?

भारतविरोधी आणि मोदीविरोधी विचारसरणीचा वार्ताहर हवा ! – ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे विज्ञापन

सत्तापालट करण्यास साहाय्य करण्याचीही अपेक्षा !
देहलीतच होणार नियुक्ती !