नागपूर येथील अधिवक्ता परमार यांची ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात ‘ईडी’कडे तक्रार !

यामध्ये  आर्थिक अपव्यवहारासह अनेक आरोप करण्यात आले आहेत.

संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसता क्षणी कह्यात घेण्याचे पुणे ग्रामीण पोलिसांना आदेश !

पायी वारीला जाण्यासाठी महाराष्ट्रातील वारकर्‍यांना ३ जुलै या दिवशी आळंदी येथे येण्याचे आवाहन संतवीर बंडातात्या कराडकर यांनी केले होते.

सातारा येथील जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई !

महाराष्ट्र सहकारी बँकेमध्ये २५ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन नंतर परत न करता बुडवले आहे. तसेच नंतर अल्प मुल्यामध्ये साखर कारखान्यांची विक्री करण्यात आली आहे.

पुलवामा येथे चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’चे ५ आतंकवादी ठार

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील शासनकर्त्यांकडून देशाच्या एका छोट्याशा भागातील आतंकवादही संपवू न शकणे, हे त्यांना लज्जास्पद ! हा आतंकवाद संपवण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !

संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी कह्यात घेण्याचे पुणे ग्रामीण पोलिसांना आदेश

पायी वारीला जाण्यासाठी महाराष्ट्रातील वारकर्‍यांना ३ जुलै या दिवशी आळंदी येथे येण्याचे आवाहन करणार्‍या संतवीर बंडातात्या कराडकर यांना दिसताच क्षणी कह्यात घेण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत.

मराठा आरक्षणाप्रकरणी केंद्राची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

‘१०२ व्या घटना दुरुस्तीनंतर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाला आरक्षण देण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतींनाच, पर्यायाने केंद्र सरकारलाच आहे’, हा ५ सदस्यीय घटनापिठाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने १ जुलै या दिवशी पुन्हा अधोरेखित केला.

अफगाणिस्तानमधील तखार प्रांतात पुन्हा लागू झाले तालिबानी कायदे !

उद्या पाकिस्तान तालिबानच्या साहाय्याने भारतावर आक्रमण करण्यापूर्वीच भारताने तालिबान आणि पाक नावाची डोकेदुखी कायमची संपवली पाहिजे !

गुजरातमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन करून जुगार खेळणारे भाजपचे आमदार आणि अन्य २५ जण यांना अटक

गुजरातमध्ये भाजपचीच सत्ता असतांना त्याच्या आमदाराकडून असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

पाकमधील थेट भारतीय उच्चायुक्तालयावर आढळले ड्रोन !

ड्रोनने जर उच्चायुक्तालयावर बॉम्बस्फोट घडवला असता, तर भारताने केवळ निषेधच व्यक्त केला असता का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !

‘मेरिटाईम कमांड’ आणि ‘एअर डिफेन्स कमांड’ स्थापन करणार !

आम्ही ‘मेरिटाईम कमांड’ आणि ‘एअर डिफेन्स कमांड’ स्थापन करत आहोत, अशी माहिती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.