पंढरपूरच्या पायी वारीला अनुमती देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली !

नवी देहली – कोरोनामुळे गेल्या वर्षी पंढरपूरची पायी वारी रहित करण्यात आली होती. यंदाही राज्यशासनाने पायी वारीला अनुमती दिलेली नाही; मात्र प्रमुख १० दिंड्यांना बसद्वारे जाण्याची अनुमती देण्यात आली आहे. राज्यशासनाने घेतलेल्या या निर्णयाला संत नामदेव महाराज संस्थानने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने १९ जुलैला झालेल्या सुनावणीच्या वेळी ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सर्व दिंड्या आणि वारकरी यांना अनुमती देण्याची मागणी फेटाळली.

‘आषाढी वारीसाठी राज्यशासनाने लाखो वारकर्‍यांसह नोंदणीकृत २५० पालख्यांना वारीची अनुमती नाकारली आहे. हा निर्णय म्हणजे वारकर्‍यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघनच आहे’, असे या याचिकेत म्हटले होते.