अररिया (बिहार) येथील एका शाळेच्या धर्मांध मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

नग्न छायाचित्रे काढून मुलीला धमकावत केले ३ मास शोषण !

  • अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • एरव्ही शरीयत कायद्याची मागणी करणारे अशा घटनांमध्ये शरीयत कायद्याद्वारे शिक्षा करण्याची कधी मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या !

अररिया (बिहार) – येथील महलगावातील एका शाळेचा मुख्याध्यापक रौशन जमीर याला एका १४ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. या विद्यार्थिनीला कपडे आणि अन्य वस्तू देण्याचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप जमीर याच्यावर करण्यात आला आहे.

जमीर याने बलात्कारानंतर या मुलीची नग्न छायाचित्रे काढून ‘बलात्काराची माहिती कुणाला सांगितल्यास ही छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करीन’, अशी धमकी दिली होती. या छायाचित्रांच्या आधारे ३ मास जमीर या मुलीचे लैंगिक शोषण करत होता.  ती गर्भवती झाल्यानंतर या शोषणाची माहिती समोर आली. याविषयी पोलिसांत तक्रार करण्यात आल्यानंतर जमीर याला अटक करण्यात आली.