आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे संचारबंदी लागू !

सर्व पालख्या शहरातून बाहेर गेल्यानंतर संचारबंदी शिथिल करण्यात येणार आहे.

मिरज विद्या समितीच्या विद्यामंदिर प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा १० वीचा निकाल १०० टक्के !

मिरज विद्या समितीच्या विद्यामंदिर प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा १० वीचा निकाल १०० टक्के लागला आहे.

राज्यात दहावीचे ७५८ विद्यार्थी अनुत्तीर्ण !

राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे शंभर प्रतिशत असून राज्यातील ९५७ विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळाले आहेत.

संभाजीनगर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील पाण्याची जोडणी तोडली !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या निवासस्थानातील पाण्याची जोडणी तोडली.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा मिरज येथे प्रारंभ !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक जनहिताचे निर्णय घेतले असून हे निर्णय आणि राबवण्यात येत असलेल्या योजना सामान्यांपर्यंत पोचवण्याचे काम आता केले जाणार आहे.

(म्हणे) ‘आमचे पाकमधील आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांच्याशी संबंध नाहीत !’ – तालिबान

अशा जिहादी आतंकवाद्यांवर कोण विश्‍वास ठेवणार ? कंदहार विमान अपहरणाच्या वेळी तालिबानचे आतंकवाद्यांशी असलेले संबंध जगजाहीर झाले होते, हे भारत कधी विसरू शकणार नाही !

सर्वोच्च न्यायालयाच्या चेतावणीनंतर उत्तरप्रदेशातील कावड यात्रा रहित !

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चेतावणीनंतर उत्तरप्रदेश शासनाने राज्यातील कावड यात्रेला दिलेली अनुमती रहित केली आहे. कावड यात्रा २५ जुलै ते ६ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात येणार होती.

अफगाणिस्तानच्या राजदूतांच्या मुलीचे पाकिस्तानमध्ये अपहरण !

अफगाणिस्तानचे राजदूत नजीबुल्ला अलीखील यांची मुलगी सिलसिला अलीखील ही १६ जुलै या दिवशी घरी जात असतांना काही लोकांनी तिचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचेही सांगण्यात येत आहे.

(म्हणे) ‘रात्री ९ वाजल्यानंतर बाहेर पडणार्‍या महिला वेश्या असल्याने त्यांना ठार मारले पाहिजे !’ – केरळमधील एका २७ वर्षीय ‘इस्लामी विद्वाना’चा फतवा

यावर महिला आयोग, स्त्री स्वातंत्र्यवादी संघटना आदी गप्प का ? मंदिर प्रवेशाच्या सूत्रावरून महिलांच्या अधिकारांची आठवण होणार्‍या तथाकथित स्त्रीवादी आता कुठल्या बिळात जाऊन लपल्या आहेत ? कि या सर्वांना हा महिलांचा अवमान वाटत नाही ?

भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक चालू

भुईबावडा घाटात रिंगेवाडीपासून ३ – ४ कि.मी. अंतरावर रस्ता खचत असल्याचे निदर्शनास येत आहे.