नन अभया यांच्या हत्येच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे पाद्री आणि नन यांना पॅरोल !

केरळ उच्च न्यायालयाकडून राज्याच्या साम्यवादी आघाडी सरकारला स्पष्टीकरण देण्याचा आदेश

(म्हणे) ‘राज्यात आमचे सरकार आल्यावर पोलीस आणि प्रशासन यांच्या अधिकार्‍यांना मूत्र पाजू !’

उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे माजी आमदार विजयपाल सिंह यांची धमकी !
पोलिसांकडून गुन्हा नोंद !

आसाम शासनाकडून कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या पत्नीला अडीच लाख रुपयांचे साहाय्य !

राज्यातील ८७३ विधवांना या योजनेचा लाभ मिळू शकतो, असे एका पहाणीत आढळून आले आहे. या सर्वांना पुढील आठवड्यापर्यंत धनादेश दिले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

रा.स्व. संघ देशातील मुसलमानबहुल भागांमध्ये शाखा चालू करणार !

संघाच्या या शाखांद्वारे मुसलमानांमध्ये अधिकाधिक राष्ट्रप्रेम निर्माण होऊन ते राष्ट्रीय प्रवाहामध्ये सहभागी होतील, अशी अपेक्षा !

मंदिर, मठ आदी ठिकाणांपासून ५ किमी परिसरात गोमांसाच्या खरेदी अन् विक्री यांवर बंदी येणार !

आसाम राज्य असा कायदा करू शकतो, तर केंद्रशासन आणि अन्य राज्ये यांनीही तो करावा, असे हिंदूंना वाटते !

वर्ष २०३० मध्ये चंद्राच्या कक्षेत पालट होऊन पृथ्वीवर पूरस्थिती निर्माण होईल ! – नासा

जागतिक हवामान पालटामुळे पृथ्वीवरील वातावरणावर परिणाम होत आहे. अंटार्टिकामधील बर्फ वितळत आहे. त्यामुळे समुद्रकिनार्‍यालगत शहरांमधील पाण्याची पातळी वाढत आहे.

कोरोना नियमांचे पालन न केल्यास तिसर्‍या लाटेचा धोका अधिक ! – इंडियन मेडिकल असोसिएशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्रीय नेतृत्व, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि देशातील डॉक्टरांचा सेवाभाव यांमुळे भारत कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेतून हळूहळू बाहेर पडत आहे; पण तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता आपल्याला अतिशय काळजीपूर्वक पावले टाकण्याची आवश्यकता आहे.

सिंहगड, खडकवासला (पुणे) येथे येणार्‍या पर्यटकांकडून ८८ सहस्र रुपयांचा दंड वसूल !

हवेली पोलिसांनी सिंहगड आणि खडकवासला परिसरात येणार्‍या १७७ पर्यटकांवर कारवाई करून ८८ सहस्र ५०० रुपयांचा दंड वसूल केला.

निधन वार्ता

कोल्हापूर येथील सनातनच्या साधिका जयश्री नाईक यांचे पती जनार्धन व्यंकटेश नाईक (वय ८५ वर्षे) यांचे १२ जुलै या दिवशी हृदयविकाराने निधन झाले.

महाकवी कालिदास यांच्या ऋतुसंहार या संस्कृत काव्याच्या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन

महाकवी कालिदास रचित ऋतुसंहार या संस्कृत काव्याचा ऋतुसंहार…एक रसानुवाद या अनुवादित पुस्तकाचे प्रकाशन मोरे यांच्या हस्ते झाले.