पुण्यात दोन ठिकाणी दरडी कोसळल्या

सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील आंदर मावळ खोर्‍यात कल्हाट येथील तासुबाई मंदिरावर दरड कोसळली. मंदिराचा बहुतांश भाग दरडीखाली गेला आहे.

लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याची केसरीवाड्यात स्थापना

केसरीवाड्यात लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानी २३ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा आणि लोकमान्य टिळक जयंती यांचे औचित्य साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली.

‘सीईटी’ची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच अकरावीची प्रवेशप्रक्रिया चालू ! – दिनकर टेमकर, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक

अकरावीच्या प्रवेशासाठी असलेली ‘सामाईक प्रवेश परिक्षा’ (सीईटी) दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येतील.

कोल्हापूर जिल्ह्यातील १०९ गावांचा वीजपुरवठा खंडित

कोल्हापुरात आलेल्या पुराने जिल्ह्यातील १०९ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, ५६ गावांचा वीजपुरवठा अंशत: खंडित झाला आहे.

शांततेत निवडणूक घेण्यासाठी भारतालाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये निमंत्रित करू ! – विरोधी पक्षांची इम्रान खान सरकारवर टीका

शांततेच निवडणुका घेण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी भारताला तेथे जायलाच हवे !

तमिळनाडूमध्ये अज्ञातांकडून पंच लिंगेश्‍वर मंदिरातील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड !

नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम् सरकारच्या राज्यात हिंदूंची मंदिरे असुरक्षितच रहाणार, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे त्यागपत्र

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र राज्यपालांकडे दिले आहे. २६ जुलै या दिवशी त्यांच्या सरकारला २ वर्षे पूर्ण झाली. त्याच दिवशी त्यांनी हे त्यागपत्र दिले आहे.

चीनची लडाखमध्ये पुन्हा घुसखोरी

आक्रमक न रहाण्याच्या भारताच्या भूमिकेचा चीन अपलाभ घेत असून तो अशा प्रकारची घुसखोरी करत आहे. यावरून भारत जेव्हा चीनला जशास तसे उत्तर देईल, तेव्हाच या घटना थांबतील !

अफगाणिस्तानमधील शीख आणि हिंदू यांना नागरिकत्व देण्यासाठी कॅनडा सरकारने योजना आखावी ! – कॅनडातील शिखांच्या संघटनांची मागणी

भारताने आधीच अशांना नागरिकत्व देण्याची घोषणा केली असतांना आणि भारत या नागरिकांसाठी जवळचा देश असतांना स्वतःचे महत्त्व निर्माण करण्यासाठीच या शीख संघटना अशी मागणी करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे लक्षात घ्या !

कोईंबतूर (तमिळनाडू) येथे हिंदूंची मंदिरे पाडल्याच्या विरोधात हिंदु मक्कल कत्छी संघटनेचे आंदोलन

नास्तिकतावादी द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रमुक) सरकारच्या काळात हिंदूंच्या मंदिरांवर असे आघात होणार आणि हिंदूंच्या संघटनांवर अन् कार्यकर्त्यांवर कारवाई होणार, यांत आश्‍चर्य ते काय ! अशा घटना कायमच्या रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !