वर्ष २००८ च्या मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार जकी उर रहमान लखवी याला १५ वर्षांची शिक्षा

प्रत्यक्षात हे आतंकवादी मोकाटच फिरतात आणि त्यांच्या कारवाया चालू असतात, असे यापूर्वी आतंकवादी हाफिज सईद याच्या उदाहरणातून उघड झाले आहे !

(म्हणे) ‘काश्मीरला स्वायत्त दर्जा मिळत नाही, तोपर्यंत भारताशी चर्चा शक्य नाही !’ – पाकचे इम्रान खान

याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकशी चर्चा करण्याची भारताला कोणतीही इच्छा नाही आणि भारत चर्चा करणारही नाही. भारताने पाकवर थेट सैनिकी कारवाई करून पाक नावाचे शत्रूराष्ट्र संपवावे, असेच भारतियांना वाटते !

बालाकोटमधील एअर स्ट्राइकमध्ये ३०० जिहादी आतंकवादी ठार !

पाकचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांची स्वीकृती : भारतीय वायूदलाच्या कारवाईवर प्रश्‍न उपस्थित करणारे आता बोलतील का ?

पाकिस्तानमध्ये राजधानी इस्लामाबादसह अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित

जळीस्थळी पाकला भारताच दिसतो, याचे हे आणखी एक उदाहरण !

(म्हणे) ‘आमचा शेजारी देश धार्मिक हिंसाचार घडवत आहे !’ – इम्रान खान यांचा भारताचे नाव न घेता आरोप

खाण कामगारांच्या हत्येची जबाबदारी सुन्नी समाजातील इस्लामिक स्टेटने घेतली असूनसुद्धा त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून भारतावर टीका करून इम्रान खान वस्तूस्थिती लपवू शकत नाहीत ! शिया संघटना यास विरोध का करत नाहीत ?

पाकमधील अल्पसंख्यांकांवरील अत्याचारांची माहिती देणारे मानाधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांच्यावर प्राणघातक आक्रमण

धर्मांधांची जिहादी वृत्ती उघड करणार्‍यांना धर्मांध कधीतरी जिवंत ठेवतील का ? असे धर्मांध मानवतेचे शत्रू असून जगाने आता त्यांच्याविरोधात संघटित होऊन त्यांचा नायनाट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि भारताने त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे !

(म्हणे) ‘मी महमूद गझनीचा वंशज असल्याने पुन्हा सोमनाथ मंदिर पाडणार !’

पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांचे फुत्कार ! धर्मांधांमध्ये सर्वधर्मसमभाव नसतो आणि ते अन्य धर्मियांच्या विशेषतः हिंदूंच्या प्रार्थनास्थळांना लक्ष्य करतात, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट होते ! त्यांनी आता सोमनाथ मंदिराऐवजी ‘पाकचे रक्षण कसे होणार ?’, हेच पाहावे !

मंदिरांच्या भूमीवरील अवैध नियंत्रण हटवून ती मुक्त करावी !

पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या अधिकारांच्या संबंधित एक सदस्यीय आयोगाने खैबर पख्तूनख्वामधील एक मंदिर पाडल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे.

२ आठवड्यांत मंदिर पुन्हा उभारा आणि तोडफोड करणार्‍यांकडून पैसे वसूल करा !

भारतात धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे केली जातात, तेव्हा येथील हिंदूंनाही असा न्याय मिळावा, अशी जनभावना आहे !

पाकमध्ये प्रतिवर्षी १ सहस्र हिंदू, शीख आणि ख्रिस्ती तरुणींचे होते धर्मांतर !

पाकमध्ये हिंदू, शीख, ख्रिस्ती आदी अल्पसंख्य समुदायातील १ सहस्र तरुणींचे प्रतिवर्षी अपहरण करून धर्मांतर ! पाकिस्तानातील स्वतंत्र मानवाधिकार आयोग सांगतो की, कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदीमुळे या घटनांमध्ये वाढ झाली आहे.