(म्हणे) ‘काश्मीरला स्वायत्त दर्जा मिळत नाही, तोपर्यंत भारताशी चर्चा शक्य नाही !’ – पाकचे इम्रान खान

जगात भारतच पाकचे एकमेव शत्रूराष्ट्र असल्याचा इम्रान खान यांचे वक्तव्य !

पाकशी चर्चा करण्याची भारताला कोणतीही इच्छा नाही आणि भारत चर्चा करणारही नाही. भारताने पाकवर थेट सैनिकी कारवाई करून पाक नावाचे शत्रूराष्ट्र संपवावे, असेच भारतियांना वाटते !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा स्वायत्त दर्जा परत मिळत नाही, तोपर्यंत भारताशी चर्चा शक्य नाही, असा पुनरुच्चार पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका मुलाखतीत केला.‘भारत सोडल्यास अन्य कोणताही देश आमचे शत्रूराष्ट्र नाही. पाकिस्तानात अस्थिरता माजवण्याचे प्रयत्न भारताकडून केले जात आहेत’, असा फुकाचा आरोपही इम्रान खान यांनी या वेळी केला. (याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! – संपादक)

इम्रान खान यांनी आरोप करतांना पुढे म्हटले की, भारताने शांतता प्रस्थापित करण्याविषयी एक पाऊल पुढे टाकायचे सोडून काश्मीरचा भूभाग हडपला आहे. भारताकडून काश्मिरी नागरिकांवर सातत्याने अन्याय केला जात आहे.