(म्हणे) ‘आमचा शेजारी देश धार्मिक हिंसाचार घडवत आहे !’ – इम्रान खान यांचा भारताचे नाव न घेता आरोप

पाकमध्ये शिया समाजातील खाण कामगारांच्या हत्येचे प्रकरण

  • जगात सुन्नींकडून जिहादी आतंकवादी कारवाया सर्वाधिक प्रमाणात होत आहेत. खाण कामगारांची हत्याही सुन्नी समाजातील आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटने केल्याचे त्यांनी म्हटले असतांना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून भारतावर टीका करून इम्रान खान वस्तूस्थिती लपवू शकत नाहीत !
  • जगातील आणि भारतातीलही शिया समाजाच्या संघटना यास विरोध का करत नाहीत ?
हत्यांचे खापर भारतावर फोडले – इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी धार्मिक हिंसाचारात आतंकवाद्यांकडून ११ शिया हजारा समाजातील खाण कामगारांची हत्या करण्यात आली. या हत्येचे दायित्व सुन्नी समाजातील आतंकवादी संघटना इस्लामिक स्टेटने घेतले आहे; मात्र पाकने या हत्यांचे खापर भारतावर फोडले आहे.

क्वेट्टा येथे या शवांना रस्त्यावर ठेवून आंदोलन करण्यात आले. ‘पंतप्रधान इम्रान खान येथे येऊन भेटत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्यात येईल’, असे शियांकडून सांगण्यात आले.

या पार्श्‍वभूमीवर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे नाव न घेता ‘शेजारी देश पाकमध्ये धार्मिक हिंसाचार भडकावत आहेे’, असा आरोप एका ट्वीटद्वारे केला.