पाकिस्तानमध्ये राजधानी इस्लामाबादसह अनेक शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित

प्रतिकात्मक चित्र

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमध्ये ९ जानेवारीच्या मध्यरात्री राजधानी इस्लामाबाद, कराची, मुलतान, रावळपिंडी आदी अनेक शहरांमधील वीज गेल्याने तेथे अंधार पसरला. अचानकपणे झालेल्या ‘ब्लॅकआउट’मुळे पाकमध्ये युद्धाच्या स्थितीची चर्चा चालू झाली होती; मात्र ‘पॉवर ट्रिपींग’मुळे ही समस्या निर्माण झाल्याचे अधिकार्‍यांनी सांगितल्यावर योग्य कारण कळाले. याआधीदेखील वर्ष २०१५ मध्ये अशीच घटना घडली होती. त्या वेळी तांत्रिक बिघाडामुळे अनेक घंटे वीजपुरवठा खंडित झाला होता.

पाकचे अंतर्गत मंत्री शेख रशीद यांनी आरोप केला की, देहलीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनावरून लक्ष दुसरीकडे जावे म्हणून भारतानेच वीज पुरवठा खंडित केला. (जळीस्थळी पाकला भारताच दिसतो, याचे हे आणखी एक उदाहरण ! – संपादक)