पाकमध्ये प्रतिवर्षी १ सहस्र हिंदू, शीख आणि ख्रिस्ती तरुणींचे होते धर्मांतर !

जागतिक स्तरावरील मानवाधिकार संघटना या तरुणींच्या रक्षणार्थ काय कृती करतात, हेही समोर यायला हवे !

कराची – पाकमध्ये हिंदू, शीख, ख्रिस्ती आदी अल्पसंख्य समुदायातील १ सहस्र तरुणींचे प्रतिवर्षी अपहरण करून धर्मांतर केले जाते.

पाकिस्तानातील स्वतंत्र मानवाधिकार आयोगाने सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदीमुळे या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सामान्यतः परिचयातील किंवा वधू शोधणार्‍या व्यक्तीकडून अपहरण होते. काही वेळा कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी जमीनदारही त्यांना कह्यात घेतात. एकदा धर्मांतर झाले की, या मुलींचा वृद्ध व्यक्तीशी किंवा अपहरणकर्त्याशी विवाह लावला जातो. या सर्वांना मौलवी, पोलीस, दंडाधिकारी यांचे साहाय्य मिळते.