|
भारतात धर्मांधांकडून हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे केली जातात, तेव्हा येथील हिंदूंनाही असा न्याय मिळावा, अशी जनभावना आहे !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील करकी जिल्ह्यातील तेरी गावात असणारे हिंदूंचे मंदिर काही दिवसांपूर्वी धर्माधांच्या जमावाने आक्रमण करून पाडून त्याला आग लावली होती. या प्रकरणी पाकच्या सर्वोच्च न्यायालयाने नोंद घेत पाक सरकारला आदेश देतांना पुढील २ आठवड्यांत मंदिर पुन्हा उभारण्यास आणि तोडफोड करणार्यांकडून पैसे वसूल करण्याचा आदेश दिला. या प्रकरणी ३५० जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून आतापर्यंत १०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. येथे श्री परमहंसजी महाराज यांची समाधी आणि श्रीकृष्ण मंदिर आहे.
“There were 92 police officials at the spot, but they showed cowardice and negligence,” the KP police chief said regarding #Karak Hindu shrine attack https://t.co/jLRUImC4YV
— Dawn.com (@dawn_com) January 5, 2021
पाकमधील सर्व मंदिरे ‘औकाफ’ विभागच्या अंतर्गत येतात. न्यायालयाने आदेश देतांना औकाफ विभागाला मंदिराच्या कामाच्या प्रगतीचा अहवालही सादर करण्यास सांगितले आहे. तसेच पाकमधील मंदिरांची संख्या, औकाफ विभागाच्या भूमीवरील अतिक्रमण, अतिक्रमण करणार्याच्या विरोधात विभागाने केलेली कारवाई या सर्वांची माहितीही न्यायालयाने मागितली आहे.