मंदिरांच्या भूमीवरील अवैध नियंत्रण हटवून ती मुक्त करावी !

पाकिस्तानमध्ये हिंदूंचे मंदिर पाडण्याची चौकशी कणार्‍या आयोगाची सर्वोच्च न्यायालयाला शिफारस

पेशावर (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील अल्पसंख्यांकांच्या अधिकारांच्या संबंधित एक सदस्यीय आयोगाने खैबर पख्तूनख्वामधील एक मंदिर पाडल्याच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर केला आहे. आयोगाने या भूमीवरील अवैध नियंत्रण मिळवणार्‍यांपासून भूमी मुक्त करावी आणि या घटनेची सरकारने विस्तृत चौकशी करावी, अशही शिफारस आयोगाने केली.

आयोगाचे अध्यक्ष शुएब सुदल यांनी सांगितले, ‘या अहवालामध्ये करक जिल्ह्यातील अल्पसंख्यांकांचे अधिकार निश्‍चित करण्याची सूचना करण्यात आली आहे.’ आयोगाने प्रांतचे मुख्यमंत्री महमूद खान यांची भेट घेतली, तेव्हा खान यांनी येथे मंदिर पुन्हा बांधण्याचे आश्‍वासन दिले.