बालाकोटमधील एअर स्ट्राइकमध्ये ३०० जिहादी आतंकवादी ठार !

पाकचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांची स्वीकृती

भारतीय वायूदलाच्या कारवाईवर प्रश्‍न उपस्थित करणारे आता बोलतील का ?

राजनैतिक अधिकारी आगा हिलाली

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताने २६ फेब्रुवारी २०१९ च्या पहाटे पाकच्या बालाकोट येथील जिहादी आतंकवादी संघटना जैश-ए-महंमदच्या प्रशिक्षण तळावर केलेल्या हवाई आक्रमणामध्ये (एअर स्टाईकमध्ये) ३०० आतंकवादी ठार झाले, अशी स्वीकृती पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी आगा हिलाली यांनी दिली. ते पाकमधील एका वृत्तवाहिनीवर बोलत होते. काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनावर करण्यात आलेल्या आतंकवादी आक्रमणात ४० सैनिक हुतात्मा झाल्यावर भारताने ही कारवाई केली होती. यात मोठ्या प्रमाणावर आतंकवादी मारले गेल्याचे वृत्त पाकने फेटाळले होते, तसेच भारतातही अनेकांनी याच्या यशाविषयी प्रश्‍न उपस्थित केले होेते.

आगा हिलाली पुढे म्हणाले की, भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून युद्धाची कृती केली. ज्यात ३०० जण ठार झाले. त्यांच्या लक्ष्यापेक्षा आपले लक्ष्य वेगळे होते. आपण त्यांच्या हाय कमांडला लक्ष्य केले.