Amarnath Yatra 2025 : ३ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार अमरनाथ यात्रा

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : अमरनाथ यात्रेच्या कालावधीची माहिती घोषित करण्यात आली आहे. यावर्षी अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून प्रारंभ होईल आणि ९ ऑगस्टपर्यंत चालेल. हा कालावधी ३८ दिवसांचा असेल. श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाच्या बैठकीत यात्रेचा दिनांक अधिकृतपणे घोषित करण्यात आला.