डोंबिवली येथे छत्रपती शिवाजी महाराजयांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

डोंबिवली, १८ मार्च (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या रयतेच्या राज्याला डंख लावण्याचा प्रयत्न औरंगजेबाने केला. छत्रपती संभाजी महाराजांची त्याने अतिशय क्रूरतेने हत्या केली. त्यामुळे औरंगजेबाचे गोडवे गाणारे, त्याचे समर्थन करणारे हे देशद्रोहीच आहेत, असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील (डॉ. घारडा सर्कल) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
प्रचंड शक्तीने हिंदुत्वासाठी एकत्र या ! – धनंजय देसाई, हिंदु राष्ट्र सेना
नुसत्या ‘रिल’ (काही सेकंदांचा व्हिडिओ) बघून पुरुषार्थ वाया घालवू नका. आपण प्रचंड शक्तीने हिंदुत्वासाठी एकत्र झाले पाहिजे. उत्तरप्रदेश येथे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसारखे नेते आपल्याला मिळाले आहेत. ‘देहलीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले आहे. ते मुख्यमंत्री असतांना गोमातेला राजमातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले. अशा या नेत्याच्या पाठीशी आपण संपूर्ण सामर्थ्यानिशी उभे राहिले पाहिजे !