क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नको !

बजरंग दलाची मागणी

औरंगजेबाची कबर

कराड, १८ मार्च (वार्ता.) – क्रूरकर्मा औरंगजेब कुणी संत महात्मा नव्हता. तो येथे आपल्याला त्रास देण्यासाठी, येथील संस्कृती तोडायला आला होता. त्यामुळे त्याची कबर महाराष्ट्रात नको, अशी मागणी कराड बजरंग दलाच्या वतीने तहसीलदार कल्पना ढवळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष पू. विठ्ठल स्वामी वडगावकर, सर्वश्री सागर आमले, सौरभ गाझी, संतोष देशपांडे, अनिल खुंटाळे यांच्यासह हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.