श्रावस्ती (उत्तरप्रदेश) – येथील सिरसिया परिसरातील उच्च प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक प्रभाकर श्रीवास्तव याने शाळेत शिकणार्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांच्याशी अश्लील चाळे केल्याचा संतापजनक प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी श्रीवास्तव याला अटक केली असून जिल्हा शिक्षण विभागाने त्याला तात्काळ निलंबित केले आहे.
श्रीवास्तव याच्या या कृत्यांमुळे अनेक मुलींनी शाळेत जाणे बंद केले होते. भीतीपोटी त्या या गोष्टी सहन करत होत्या. श्रीवास्तवचे कृत्य असाहाय्य होऊन शाळेतील २ विद्यार्थिनींनी धाडस दाखवून याला वाचा फोडली. तेव्हा इतर शिक्षक, पालक आदी विद्यार्थिनींच्या पाठीशी उभे राहिले. संतप्त पालकांनी जोखवा पोलिसांकडे लिखित तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून त्यास अटक केली.
संपादकीय भूमिकाअशांना सरकारने जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा मिळण्यास प्रयत्न केल्यास असे कृत्य करण्याचे धाडस कुणीही करणार नाही ! |