श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथील कृष्णा खोर्यामध्ये ४ फेब्रुवारी या दिवशी भारतीय सैन्याने घुसखोरी करणार्या पाकपुरस्कृत आतंकवाद्यांना ठार मारले. हे पाकिस्तानी आतंकवादी भारतात घुसखोरीचा प्रयत्न करत असतांनाच भूसुरुंगाचा स्फोट झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. ठार झालेल्यांमध्ये २-३ जण पाकचे सैनिक असल्याचेही म्हटले जात आहे.