(मौलाना म्हणजे इस्लामचा अभ्यासक (विद्वान))
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरच्या सोपोर शहरातील मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी मौलाना ऐजाज शेख याला २ अल्पवयीन मुलींवर १० वर्षे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी १४ वर्षांच्या कारावासाची आणि १ लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. यांपैकी प्रत्येक पीडिताला ४५ सहस्र रुपये भरपाई म्हणून दिले जातील. ऐजाज अहमद शेख स्वतःला मौलाना म्हणवून लोकांची फसवणूक करायचा. तो निष्पाप पालकांचा गैरफायदा घेऊन मुलींचे शोषण करायचा.
संपादकीय भूमिकाअशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |