खर्ची खू (ता. एरंडोल) येथे ‘हिंदुराष्ट्र खर्ची खू’ फलकाचे अनावरण !

फलकाचे अनावरण करतांना धर्मप्रेमी

खर्ची खू, तालुका एरंडोल – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खर्ची खू येथे ‘हिंदुराष्ट्र खर्ची खू’ फलकाचे अनावरण करण्यात आले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे आणि श्री. निखिल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील हिंदु धर्मप्रेमींनी विशेष प्रयत्न केले. गावातील सरपंच, उपसरपंच, तसेच प्रतिष्ठित नागरिक आणि महिला या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या वेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रकाश टाकत हिंदुत्व आणि राष्ट्रभक्ती यांचा जागर करण्याचे आवाहन केले. तसेच ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्याचप्रमाणे आपल्यालाही स्वतःचे हक्काचे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. समस्त हिंदु बांधवांनी हिंदु धर्माचे शिक्षण घेऊन सांस्कृतिक हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील रहावे’, अशी ग्वाही या वेळी देण्यात आली.

येत्या गुढीपाडव्यानिमित्त सामूहिक गुढी उभारून गुढीचे धर्मशास्त्र जाणून घेण्याविषयीचे नियोजन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त गावात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.