हिंदूंचे प्रभावी संघटन उभे करा आणि हिंदुत्वाच्या सूत्रासाठी कार्य करा ! – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

डावीकडून श्री. सुनील घनवट, उपस्थितांना मार्गदर्शन करतांना आमदार टी. राजासिंह आणि सद्गुरु स्वाती खाडये

कोल्हापूर, १८ मार्च (वार्ता.) – हिंदुत्वाचे कार्य मग ते कोणत्याही संघटनेचे असो, त्यात एक हिंदु म्हणून सहभागी व्हा. यापुढील काळात देशात गृहयुद्धासारखी स्थिती होऊ शकते, अशी स्थिती आहे. हिंदूंनी या पुढील काळात अत्यंत सतर्क आणि जागृत राहिले पाहिजे. त्यामुळे हिंदूंचे प्रभावी संघटन उभे करा आणि हिंदुत्वाच्या सूत्रासाठी कार्य करा, असे आवाहन तेलंगाणा येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले. ते ‘हॉटेल’ तुळशी येथे हिंदुत्वनिष्ठांसाठी आयोजित मार्गदर्शनात बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक श्री. सुनील घनवट आणि सनातन संस्थेच्या सद्गुरु स्वाती खाडये उपस्थित होत्या.

या प्रसंगी आमदार टी. राजासिंह यांनी ते निवडून येण्यापूर्वी तेलंगाणाची काय स्थिती होती, त्यांनी लोकप्रतिनिधी होण्यासाठी कसा संघर्ष केला, हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधी झाल्यावर राजकीय प्रवासात त्यांना कशा अडचणी निर्माण केल्या गेल्या आणि या सर्वांवर त्यांनी कशा प्रकारे मात केली, हे हिंदुत्वनिष्ठांना सांगितले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी हिंदुत्वाच्या विविध सूत्रांवर काम करतांना येणार्‍या अडचणींवर मार्ग कसा काढावा ? यांविषयी शंकानिरसन करून घेतले.

बैठकीसाठी उपस्थित विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि पक्ष यांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते

नागपूरपासून चालू झालेले दंगलीचे लोण कोल्हापूर मध्येही पोचू शकते !

नागपूरमध्ये धर्मांधांनी जी दंगल घडवली, तिचे लोण महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आणि कोल्हापूर येथेही पोचू शकते. यासाठी हिंदूंनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. नागपुरात केवळ हिंदूंवरच नाही, तर पोलिसांवरही मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली, तर एका पोलीस अधिकार्‍यावर कुर्‍हाडीने वार करण्यात आले. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असल्याने जाणीवपूर्वक तेच ठिकाण निवडण्यात आले.

आमदार टी. राजासिंह यांनी सकाळी ९ वाजता कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी आणि मातृलिंग यांचे दर्शन घेतले.