प्रसिद्धीमाध्यमांचे हिंदुविरोधी कथानक (नॅरेटिव्ह) जाणा !

१० सहस्र हिंदूंच्या मोर्चास अल्प प्रसिद्धी; मात्र त्याच विषयावरील पुरोगाम्यांच्या वृत्ताला व्यापक प्रसिद्धी !

कोल्हापूर येथे १७ मार्चला हिंदुत्वनिष्ठांचा झालेला मोर्चा

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापिठाचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असा होण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या पुढाकाराने १७ मार्चला कोल्हापूर येथे भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला १० सहस्रांहून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. या मोर्चाच्या अगोदर पुरोगामी आणि साम्यवादी यांनी नामविस्ताराच्या विरोधात बैठका घेतल्या, तसेच जिल्हाधिकारी अन् शिवाजी विद्यापिठाचे कुलगुरु यांना निवेदन दिले. त्यासाठी पुरोगामी आणि साम्यवादी यांच्या कार्यकर्त्यांची अत्यल्प उपस्थिती असूनही प्रसिद्धीमाध्यमांनी या वृत्ताला मोठी प्रसिद्धी दिली. याउलट कोल्हापूर येथे १७ मार्चला हिंदुत्वनिष्ठांचा झालेला मोर्चा ही त्या दिवशीची शहरातील सर्वांत मुख्य घटना असतांनाही काही प्रसिद्धीमाध्यमे सोडल्यास अनेक वर्तमानपत्रांनी ही बातमी आतील पानावर प्रसिद्ध केली.

मोर्चा झाला त्या दिवशी नामविस्तारास विरोध असणार्‍या काही संघटनांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले, तर शिवाजी विद्यापीठ येथे काही संघटनांनी आंदोलन केले. यासाठीही हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक असतांना तुलनेत त्यांना वृत्तासाठी अधिक जागा देण्यात आली. यावरून पुरोगामी कशाप्रकारे ‘नॅरेटिव्ह’ (कथानक) सिद्ध करतात आणि पुरोगाम्यांची ‘इकोसिस्टम’, कशी कार्य करते ?, हे  लक्षात येते.