बीड येथील ‘ज्ञानराधा मल्टीस्टेट’च्या ठेवीदारांचे पैसे परत देऊ ! – मुख्यमंत्री

मुंबई, १८ मार्च (वार्ता.) – बीड जिल्ह्यातील ‘ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑप. सो.लि.’ या अधिकोषाच्या (बँकेच्या) संचालकांच्या ८० मालमत्ता जप्त केल्या आहेत. त्यांची विक्री करण्याचा गुन्हे शाखेच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्या ६ सहस्र कोटी रुपयांच्या आहेत. त्याची विक्री करून ठेवीदारांचे पैसे देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले. याविषयी राष्ट्रीय काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी तारांकित प्रश्न मांडला होता.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण (एम्.पी.आय.डी.) या कायद्यानुसार पतसंस्थांतील, मल्टीस्टेट अधिकोषांतील ठेवीदारांचे पैसे परत देण्यात येतात. त्यासाठी प्रशासक नेमण्याची आवश्यकता नाही. या कायद्यानुसार अटक केलेल्यांना जामीन लवकर मिळत नाही.