J&K Govt Sacks Employees : जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद्यांशी संबंध असणार्‍या पोलीस हवालदारासह ३ सरकारी कर्मचारी बडतर्फ !

उपराज्यपालांनी दिला आदेश

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी एका पोलीस हवालदारासह ३ सरकारी कर्मचार्‍यांना आतंकवाद्यांशी असलेल्या संबंधांवरून बडतर्फ केले आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० रहित झाल्यानंतर अशा प्रकारे कारवाई झालेल्यांची सरकारी कर्मचार्‍यांची संख्या आता ६९ झाली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री झाल्यानंतरची अशा स्वरूपाची ही दुसरी कारवाई आहे. ३० नोव्हेंबरला सिन्हा यांनी देशविरोधी कारवाया आणि आतंकवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून २ सरकारी अधिकार्‍यांच्या सेवा बडतर्फ केल्या होत्या.

आता झालेल्या बडतर्फीच्या कारवाईत हवालदार फिरदौस अहमद भट, सरकारी शिक्षक महंमद अशरफ भट आणि जम्मू-काश्मीर वन विभागातील अधिकारी निसार अहमद खान यांचा समावेश आहे. हवालदार फिरदौस अहमद भट याचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचे मे २०२४ मध्ये प्रथमच समोर आले. त्याच्यावर आतंकवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवण्याची व्यवस्था करण्याचा आरोप आहे.