
अहिल्यानगर (मनमाड) – देहरे गावातील एका महिलेला तिच्या मुलाला मारण्याची धमकी देऊन पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एम्.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तन्वीर शेख, सोहेल शेख आणि अल्फेज शेख, अशी आरोपींची नावे असून या सर्वांनी महिलेचा छळ करून अत्याचार केले. आरोपी तन्वीर शेख याने महिलेची ‘इन्स्टाग्राम’वर ओळख करून वारंवार संदेश आणि संपर्क केले. त्याला प्रतिसाद न दिल्याने त्याने अपकीर्ती करण्याची आणि मुलाला ठार मारण्याची धमकी देत महिलेकडून १० सहस्र रुपये आणि दागिने घेतले. महिलेने घाबरून पैसे आणि दागिने दिल्यानंतर सोहेल शेख अन् अल्फेज शेख यांनी तिला गाडीत बसवून तिचे अपहरण केले. तोंड दाबून धमक्या देत तिचा भ्रमणभाष काढून घेतला आणि संगमनेर-अकोले-भंडारदरा परिसरात फिरवून तिचे दागिने अन् पैसे लुटून तिला सोडून पळ काढला. पोलिसांनी त्या महिलेला कह्यात घेतले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
संपादकीय भूमिका :
|