विक्रम भावे आणि धर्मप्रेमी अधिवक्ते यांचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार !
विक्रम भावे आणि धर्मप्रेमी अधिवक्ते यांचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार !
विक्रम भावे आणि धर्मप्रेमी अधिवक्ते यांचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार !
कायद्याचे पालन केले पाहिजे, कायदा हातात घेऊ नये, याविषयीची शिकवण केवळ हिंदूंना दिली जाते. पोलीस आणि अधिवक्ता याचा अपलाभ उठवून निष्पाप हिंदूंना फसवण्याचे काम करत आहेत.
वर्ष १६७२ मध्ये औरंगजेबाने केवळ ज्ञानवापी मंदिरच नव्हे, तर भारतातील सहस्रावधी मंदिरे तोडली. ‘भगवान शिवाचे मूलधाम ज्ञानवापी मशीद आहे’, असे पुढील पिढीला आपण सांगणार आहोत का ?
वर्ष १९७८ मध्ये भारत-पाकिस्तानमधील हॉकी सामना पाकने जिंकल्यानंतर त्याच्या खेळाडूंनी मैदानात सामूहिक नमाजपठण केले होते आणि ‘आम्ही हिंदूंना हरवले’, असे म्हटले होते.
बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतो ?, हे माहिती नसते. त्यामुळे सध्या केवळ हिंदु दुकानदारांना प्रसादशुद्धीसाठी ‘ओम प्रमाणपत्र’ वितरित करण्याचा उपक्रम चालू करण्यात आला आहे.
गुरूंचा आशीर्वाद असल्याने हे कार्य यशस्वी होत आहे. समाज आणि राष्ट्र यांच्या हिताचे हे कार्य आपण निर्भिडपणे केले पाहिजे. यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श आपल्या समोर ठेवला पाहिजे.
श्री तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीमध्ये प्राप्त झालेले पैसे, दागिने यांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. ठेकेदार आणि विश्वस्त यांनी संगनमताने देवनिधीची लूट केली. तुळजापूर देवस्थानमध्ये भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केल्यावर सरकारने सी.आय.डी.द्वारे अन्वेषण चालू केले.
हिंदु राष्ट्राची संकल्पना ही आध्यात्मिक राष्ट्राची संकल्पना आहे; मात्र ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ या दोन्ही शब्दांचा बागुलबुवा करून हिंदु राष्ट्राच्या विरोधात खोटे कथानक (नॅरेटिव्ह) निर्माण केला जात आहे.
हिंदु राष्ट्रासाठीच्या प्रत्यक्ष लढ्यात आपल्यासारखे सामान्य कार्यकर्ते सहभागी असतील; मात्र आज विरोधकांनी वैचारिक युद्ध चालू केले आहे. ते जिंकण्यासाठी वैचारिक योद्घ्यांची आवश्यकता आहे.
स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यसैनिकांसाठी मंदिरे शक्तीकेंद्र बनली होती. त्यामुळे इंग्रजांनी एक कायदा बनवून मंदिरांचे महत्त्व आणि प्रतिष्ठा अल्प करण्याचा प्रयत्न केला.