भारतासाठी क्रिकेट धर्म असला, तरी पाकिस्‍तानसाठी तो ‘क्रिकेट जिहादच आहे ! – अधिवक्‍ता विनीत जिंदाल, उच्‍च आणि सर्वोच्‍च न्‍यायालय

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा सहावा दिवस  : अधिवक्‍त्‍यांचे न्‍यायालयीन कार्य आणि संघर्ष

अधिवक्‍ता विनीत जिंदाल

विद्याधिराज सभागृह : भारतात क्रिकेट एक खेळ म्‍हणून खेळला जातो; पण पाकिस्‍तान-भारत सामना हा पाकिस्‍तान्‍यांसाठी युद्धासारखा असतो. पाकिस्‍तानचे माजी क्रिकेट कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्‍हटले होते, ‘भारतासाठी क्रिकेट खेळ असेल; पण आमच्‍यासाठी तो जिहाद आहे.’ यावरून जगात ‘क्रिकेट जिहाद’ अस्‍तित्‍वात आहे, असे वक्‍तव्‍य उच्‍च आणि सर्वोच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता विनीत जिंदाल यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या सहाव्‍या दिवशी ‘क्रिकेट जिहादच्‍या विरोधात केलेले न्‍यायालयीन कार्य’, या विषयावर बोलतांना केले.

‘क्रिकेट जिहाद’ अधिक स्‍पष्‍ट करतांना अधिवक्‍ता विनीत जिंदाल म्‍हणाले, ‘‘वर्ष १९७८ मध्‍ये भारत-पाकिस्‍तानमधील हॉकी सामना पाकने जिंकल्‍यानंतर त्‍याच्‍या खेळाडूंनी मैदानात सामूहिक नमाजपठण केले होते आणि ‘आम्‍ही हिंदूंना हरवले’, असे म्‍हटले होते. नुकतेच पाकिस्‍तानच्‍या एका फलंदाजाने त्‍याचे शतक पॅलेस्‍टाईनला समर्पित केले होते. तसेच पूर्वी वेस्‍ट इंडिजचे लोकप्रिय फलंदाज ब्रायन लारा यांना पाकिस्‍तानच्‍या खेळाडूने इस्‍लाम स्‍वीकारण्‍यास सांगितले होते. अशा प्रकारे पाकिस्‍तानकडून सतत क्रिकेट जिहादला प्रोत्‍साहन दिले जात आहे. क्रिकेटचे इतके व्‍यवहारीकरण झाले आहे की, या जिहादकडे जागतिक क्रिकेट संघटना पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. हा जिहाद थांबवण्‍यासाठी मी भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ आणि जागतिक क्रिकेट संघटना यांच्‍याशी पत्रव्‍यवहार केला आहे.’’

वर्ष २०२३ मध्‍ये विश्‍वचषकाच्‍या सामन्‍यासाठी पाकिस्‍तानी सूत्रसंचालिका झैनब अब्‍बास भारतात आली होती. त्‍या वेळी तिने हिंदूंच्‍या देवता आणि सचिन तेंडुलकर यांच्‍या विरोधात अवमानजनक टिपणी केली होती. त्‍याविरोधात मी देहलीमध्‍ये सायबर तक्रार नोंदवली. त्‍यानंतर झैनब घाबरून दुबईला पळाली. त्‍या वेळी एका क्रिकेट खेळाडूने मैदानात नमाज पठण केले होते. जोडे घालून नमाजपठण करणे इस्‍लामविरोधी असतांनाही त्‍याकडे त्‍यांच्‍या लोकांनी दुर्लक्ष केले. यावरून मैदानात नमाजपठण करण्‍यामागे इस्‍लामचा प्रचार करणे, हे कारण आहे, असे अधिवक्‍ता विनीत जिंदाल म्‍हणाले.ही अधिवक्‍ता खंडेलवाल यांच्‍याकडे पाहून पैसे नाकारले.