नवी देहली – भारतीय नौदलाने प्रथमच आण्विक पाणबुडी ‘अरिघात’वरून अण्वस्त्र डागू शकणार्या बॅलेस्टीक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३ सहस्र ५०० कि.मी. आहे. जर भूमीवरून आक्रमण करण्यासारखी परिस्थिती नसेल, तर पाण्यातून शत्रू देशावर अण्वस्त्र आक्रमण करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे.
🚀🇮🇳 Indian Navy Successfully Tests Nuclear-Capable K-4 Missile from INS Arighaat!!
The missile, with a range of 3500 km, enhances India’s sea-based nuclear deterrence capabilities! 💥#K4Missile #NuclearDeterrence pic.twitter.com/M2v5QDdC6Q
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 28, 2024
भारत कुणावरही प्रथम अण्वस्त्रांद्वारे आक्रमण करणार नाही, असे भारताचे धोरण आहे; परंतु भारतावर कुणी अण्वस्त्रांद्वारे आक्रमण केले, तर भारत त्यांना सोडणार नाही. त्यामुळे अशा आक्रमणासाठी हे क्षेपणास्त्र महत्त्वाचे मानले जात आहे.