हिंदु तरुणीवरील आक्रमणाप्रकरणी धर्मांध मुसलमानांवर गुन्हा नोंदवण्यास पोलिसांकडून टाळाटाळ !

  • नवी मुंबई येथील घटना !

  • बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा नोंदवून घेण्यास पोलिसांना भाग पाडले !

नवी मुंबई – तळवली नोसिल नाका परिसरात किरकोळ कारणावरून एका हिंदु तरुणीवर धर्मांध आणि अन्य तरुण यांनी जीवघेणे आक्रमण केले होते. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यास रबाळे पोलिसांनी टाळाटाळ केली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मात्र पाठपुरावा करून पोलिसांना गुन्हा नोंद करून घेण्यास भाग पाडले.
बजरंग दल जिल्हा सहसंयोजक तेजस पाटील म्हणाले, ‘‘७ नोव्हेंबर या दिवशी  तळवली नोसिल नाका परिसरातील गल्लीमध्ये टोळके करून टिंगलटवाळी करणार्‍या तरुणांना एका हिंदु तरुणीने हटकले होते. त्या वेळी तिच्या भावाशी तरुणांची वादावादी झाली. याचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये तरुणीवर धर्मांध आणि अन्य तरुण यांनी जीवघेणे आक्रमण केले होते. या घटनेनंतर तरुणीने भावासह पोलीस तक्रार केली; परंतु १५ दिवस उलटले, तरी संबंधित तरुणांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला नव्हता. हे लक्षात आल्यावर बजरंग दलाच्या आमच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा नोंदवण्यास रबाळे पोलिसांना भाग पाडले. रात्री १०.३० ते पहाटे ४ वाजेपर्यंत गुन्हा नोंदवून घेण्याची प्रक्रिया चालू होती. गुन्हा नोंदवल्यानंतरच आम्ही पोलीस ठाण्यातून बाहेर आलो.’’

अमली पदार्थ विक्रेत्यांच्या मुळावर घाव घालण्याची मागणी !

या परिसरात काही जिहादी युवकांकडून अमली पदार्थांची विक्री केली जाते. हे पदार्थ सेवन करण्यासाठी काही युवक बाहेरून आले होते. त्यांनी ही मारहाण केली होती. ‘पोलिसांनी नशेच्या आहारी जाणार्‍या तरुण पिढीला वाचवण्यासाठी अमली पदार्थ विक्री करणार्‍यांच्या मुळावर घाव घालावा’, अशी मागणीही पाटील यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंवर तत्परतेने गुन्हे नोंदवणारे पोलीस धर्मांध मुसलमानांवर गुन्हा नोंदवण्यात हयगय करतात, हे लक्षात घ्या ! हिंदूंमधील सामंजस्याची वृत्ती आणि अतीसहिष्णुता या सद्गुणविकृतींचाच हा परिणाम आहे, हेच खरे !