इस्लामाबाद (पाकिस्तान) – बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी नुकतीच पाकिस्तानला भेट दिली. त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली. लुकाशेन्को यांनी काश्मीर प्रश्नावर भारताच्या विरोधात वक्तव्य करावे, अशी पंतप्रधान शरीफ यांची इच्छा होती; पण त्यांनी तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. बेलारूस रशियाचा शेजारी असणारा मित्रदेश आहे.
या संदर्भात पाकिस्तानी पत्रकाराने सांगितले की, पंतप्रधान शरीफ यांनी लुकाशेन्को यांच्यासमोर काश्मीरचे सूत्र उपस्थित केले; पण यावर लुकाशेन्को यांनी कोणतेही वक्तव्य करणार नसल्याचे म्हटले. ते म्हणाले, ‘मी केवळ २ देशांमध्ये व्यवसाय कसा वाढवता येईल’, या सूत्रावर चर्चा करण्यासाठी आलो आहे. बेलारूस आणि पाकिस्तान यांचे संबंध कसे सुधारता येतील, यावरच बोलेन. काश्मीर किंवा अन्य कोणत्याही राजकीय सूत्रावर कोणतेही वक्तव्य मी करणार नाही.’ अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
संपादकीय भूमिकापाकला मिळालेली ही चपराकच होय ! असा कितीही अपमान झाला, तरी पाकचे शेपूट वाकडे ते वाकडेच रहाणार आहे ! |