नवी देहली – देशाची राजधानी देहलीतील प्रशांत विहार परिसरात २८ नोव्हेंबरला सकाळी स्कूटरमध्ये स्फोट झाला. या स्फोटानंतर स्कूटरला आग लागली. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच देहली पोलीस घटनास्थळी पोचले. पोलिसांनी अन्वेषण चालू केले आहे.
🚨🌆 A low-intensity Explosion Near Delhi’s PVR Cinema; No major injuries/damages reported
Police & investigation teams are on the scene, examining the incident and a mysterious white powder-like substance found nearby 🔍#PrashantVihar #DelhiExplosion pic.twitter.com/QEyVfI5XXd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 28, 2024
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत विहार परिसरात मिठाईच्या दुकानाजवळील स्कूटरमध्ये हा मोठा स्फोट झाल्याचे प्राथमिक अन्वेषणात उघड झाले आहे. घटनास्थळी पांढर्या पावडरसारखा पदार्थ सापडल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वी २० ऑक्टोबर या दिवशी रोहिणीच्या प्रशांत विहार परिसरातील ‘सी.आर्.पी.एफ्.’ शाळेच्या आवारात स्फोट झाला होता. हा स्फोट इतका शक्तीशाली होता की, त्याचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकू आला होता. आजूबाजूच्या परिसरात १० मिनिटे धुराचे लोट पसरले होते. अनेक दुकाने आणि वाहने यांच्या काचा तुटल्या होत्या. त्यावेळीही घटनास्थळी पांढरी पूड सापडली होती.
संपादकीय भूमिकाहा स्फोट नेमका कशामुळे झाला आणि त्यामागे कोण आहेत, यामागील सत्य जनतेला समजणे आवश्यक ! |