मंदिराचे सौंदर्यीकरण करायला ती पर्यटनस्थळे नव्हेत, तीर्थक्षेत्रे आहेत ! – अनिल कुमार धीर, संयोजक, ‘इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’, ओडिशा

ओडिशामधील सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिराचे सौंदर्यीकरण करण्यासाठी २२ प्राचीन मठ तोडण्यात आले. या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो, तर आम्हालाच १ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

वक्‍फ बोर्डप्रमाणे हिंदु मंदिरांसाठी सर्वाधिकार देणारे ‘मंदिर बोर्ड’ स्‍थापन करा ! – अधिवक्‍ता विष्‍णु जैन, सर्वोच्‍च न्‍यायालय

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या पाचव्‍या दिवशी पत्रकार परिषद विद्याधिराज सभागृह – ज्‍या प्रमाणे मुसलमानांच्‍या धार्मिक मालमत्ता आणि भूमी संरक्षित करण्‍यासाठी तत्‍कालीन काँग्रेस सरकारने वक्‍फ बोर्ड स्‍थापन करून त्‍याला विशेष कायदेशीर अधिकार दिले आहेत, त्‍याच धर्तीवर देशभरातील हिंदूंची लाखो मंदिरे, त्‍यांची भूमी आणि संपत्ती संरक्षित करण्‍यासाठी वक्‍फ बोर्डाप्रमाणे मंदिरांसाठी सर्वाधिकार असलेला ‘हिंदु मंदिर बोर्ड’ स्‍थापन करण्‍यात … Read more

Devgiri Fort : पूजाबंदीचा निर्णय मागे न घेतल्यास हिंदुत्वनिष्ठ मंदिरात जाऊन सामूहिक पूजा करतील !

पूजाबंदीच्या निर्णयाचा गोव्यात चालू असलेल्या ‘वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त निषेध !

बांदिवडे गावचे (फोंडा, गोवा) सरपंच रामचंद्र नाईक यांचा वैश्विक हिंदु राष्ट्र अधिवेशनात सत्कार !

बांदिवडे गावचे सरपंच श्री. रामचंद्र नाईक हे २८ जून या दिवशी रामनाथ मंदिर येथे चालू असलेल्या वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये उपस्थित राहिले होते. या वेळी सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी श्री. रामचंद्र नाईक यांचा व्यासपिठावर सत्कार केला.

भाजपचे प्रवक्‍ते माधव भंडारी यांचा ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’त सत्‍कार

भाजपचे महाराष्‍ट्र राज्‍य प्रवक्‍ते श्री. माधव भंडारी यांनी २८ जून या दिवशी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या स्‍थळी भेट दिली. त्‍यानिमित्त हिंदु जनजागृती समितीचे महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक श्री. सुनील घनवट यांनी त्‍यांंचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्‍तू देऊन सत्‍कार केला.

सनातन संस्‍थेच्‍या ‘अध्‍यात्‍माचे प्रास्‍ताविक विवेचन’ या गुजराती ‘ई-बुक’चे प्रकाशन !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या ५ व्‍या दिवशी म्‍हणजे २८ जून या दिवशीच्‍या पहिल्‍या सत्रात सनातन संस्‍थेच्‍या ‘अध्‍यात्‍माचे प्रास्‍ताविक विवेचन’ या गुजराती ‘ई-बुक’चे प्रकाशन उत्तरप्रदेशातील पावन चिंतन धारा आश्रमचे संस्‍थापक पू. प्रा. पवन सिन्‍हा गुरुजी यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवस (२८ जून) उद़्‍बोधन सत्र – मदिंरांचे सुव्‍यवस्‍थापन

सनातन धर्माच्‍या अर्थशास्‍त्रामध्‍ये मंदिरांचे स्‍थान अतिशय महत्त्वाचे आहे. सनातन धर्मामध्‍ये मंदिरांच्‍या अर्थकारणातून शिक्षणप्रणाली चालवली जात होती. मंदिरांमधील अर्थव्‍यवस्‍थेवरून गावांची निर्मिती होत होती.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाचा चौथा दिवस (२७ जून) : हिंदु राष्‍ट्रसाठी वैचारिक आंदोलन

५०० वर्षे मुसलमानांनी भारताला लुटले, मंदिरे तोडली; मात्र हिंदूंचा विश्‍वास ते तोडू शकले नाहीत. आक्रमकांनी भारताला मोठ्या प्रमाणात लुटले, तरी त्‍यावेळी भारताची आर्थिक स्‍थिती जगात भक्‍कम होती.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा पाचवा दिवस (२८ जून) : मंदिर संस्‍कृतीचे पूनर्जीवन

मंदिरातील पुरोहितांचा धर्म केवळ लोकांना टिळा लावण्‍यापुरता मर्यादित नाही. त्‍यांनी हिंदूंना धर्माचे शिक्षण देणेही अपेक्षित आहे. त्‍यातून हिंदूंचा धर्माभिमान वाढून त्‍यांचे मनोबल वाढेल आणि सर्व संघटित होतील.

प्रत्येक राज्यात हिंदु विचारवंतांचे संघटन होणे आवश्यक ! – मोहन गौडा, कर्नाटक राज्य प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

एका संदेशावरून केवळ २ दिवसांमध्येच मुसलमान एकवटले. हिंदूंनीही अशा प्रकारची संपर्कव्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी हिंदु विचारवंतांचे संघटन आवश्यक आहे.