Demand To Stop Visas To Bangladeshis : बांगलादेशींना व्‍हिसा देणे आणि व्‍यापार थांबवावे ! – भाजपची मागणी

(व्‍हिसा म्‍हणजे एखाद्या देशात प्रवेश करण्‍याची अनुमती देणारा अधिकृत कागद किंवा शिक्‍का)

भाजपच्‍या कार्यकर्त्‍यांनी सुवेंदू अधिकारी यांच्‍या नेतृत्‍वाखाली निदर्शने केली.

कोलकाता (बंगाल) – चिन्‍मय प्रभु यांची सुटका होत नाही, तोपर्यंत सर्व बांगलादेशींना व्‍हिसा देणे तातडीने थांबवावे, तसेच अल्‍पसंख्‍यांकांवर होणारे अत्‍याचार थांबत नाहीत तोपर्यंत, व्‍यापार म्‍हणजे आयात-निर्यात थांबवावी, अशा मागण्‍या भाजपचे बंगालचे अध्‍यक्ष सुवेंदू अधिकारी यांनी केल्‍या आहेत. ‘चिन्‍मय प्रभु यांच्‍या अटकेच्‍या प्रकरणी संयुक्‍त राष्‍ट्रांनी हस्‍तक्षेप करावा’ अशी मागणी केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केली आहे. कोलकाता येथे भाजपच्‍या कार्यकर्त्‍यांनी सुवेंदू अधिकारी यांच्‍या नेतृत्‍वाखाली निदर्शने केली. या वेळी बांगलादेश उपउच्‍चायुक्‍तालयाला निवेदन सादर करण्‍यात आले.

भारत आणि बांगलादेश येथील इस्‍कॉनच्‍या शाखांनीही चिन्‍मय प्रभु यांच्‍या सुटकेची मागणी केली आहे. कोलकात्‍यामधील इस्‍कॉनच्‍या शाखेने सर्व घडामोडींबद्दल केंद्र सरकारला माहिती दिली आहे.