American Hindu Condemn Bangladeshi Hindus Attacks : बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य केल्‍याविषयी अमेरिकेत संताप : बांगलादेशावर निर्बंध लादण्‍याची हिंदू-अमेरिकन गटाची मागणी !

वॉशिंग्‍टन – बांगलादेशात हिंदूंना सतत लक्ष्य केले जात आहे. इस्‍लामी कट्टरतावाद्यांकडून हिंदु मंदिरे आणि हिंदूंची घरे यांची तोडफोड केली जात आहे.  अलीकडेच प्रसिद्ध हिंदु नेते चिन्‍मय कृष्‍ण दास यांना अटक करण्‍यात आली. बांगलादेशात अल्‍पसंख्‍यांकांना लक्ष्य केल्‍याविषयी अमेरिकेत संताप व्‍यक्‍त होत आहे. बांगलादेशावर निर्बंध लादण्‍यात यावे, अशी मागणी हिंदू-अमेरिकन गटाने केली आहे. ५ ऑगस्‍टपासून बांगलादेशाच्‍या ५० जिल्‍ह्यांमध्‍ये २०० हून अधिक आक्रमणे झाली आहेत. नुकतीच बांगलादेशातील हिंदु आध्‍यात्‍मिक नेते चिन्‍मय कृष्‍ण दास यांना देशद्रोहाच्‍या प्रकरणात अटक करण्‍यात आली. यामुळे राजधानी ढाकासह विविध ठिकाणी हिंदु समुदायाच्‍या सदस्‍यांनी निदर्शने केली.

१. विश्‍व हिंदु परिषद अमेरिकेचे (व्‍ही.एच्.पी.ए.चे) अध्‍यक्ष अजय शहा म्‍हणाले की,  बांगलादेशात हिंदूंवर होणारी आक्रमणे अस्‍वस्‍थ करणारी आहेत. ‘याविषयी आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील निषेधांचा अभाव गुन्‍हेगारांना प्रोत्‍साहन देतो’, असे ते म्‍हणाले.

२. विहिंपचे सरचिटणीस अमिताभ मित्तल म्‍हणाले, ‘‘बांगलादेशात अल्‍पसंख्‍यांकांवर चालू असलेल्‍या अत्‍याचारांविषयी जागतिक प्रसारमाध्‍यमांचे मौन धक्‍कादायक आहे.’

३. ‘हिंदू फॉर अमेरिका फर्स्‍ट’ने (एच्.एफ्.ए.एफ्.ने) अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्‍ट्राध्‍यक्ष डॉनल्ड ट्रम्‍प यांना लिहिलेल्‍या खुल्‍या पत्रात म्‍हटले आहे की, बांगलादेशातील हिंदूु, बौद्ध आणि ख्रिस्‍ती समुदाय यांना हिंसाचार आणि भेदभाव यांना सामोरे जावे लागले आहे. बांगलादेशातील अल्‍पसंख्‍याकांचे रक्षण करण्‍यासाठी अमेरिकेने बांगलादेशावर दबाव आणावा, अशी मागणी त्‍यांनी या पत्रात केली आहे.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील हिंदूंवर होणार्‍या अत्‍याचारांच्‍या विरोधात अमेरिकेतील हिंदू कृती करतात; मात्र भारतातील जन्‍महिंदू काही करत नाहीत, हे संतापजनक !