युद्धापेक्षा तणावामुळे अधिक प्रमाणात होत आहे भारतीय सैनिकांचा मृत्यू !

तणावग्रस्त सैनिक भविष्यात युद्ध पेटल्यास त्याला सक्षमरित्या कसे सामोरे जातील ? भारतातील आतंकवादाला उत्तरदायी असणार्‍या पाकला नष्ट केल्याचा दुष्परिणाम सैनिकांवर होत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सर्वपक्षीय  शासनकर्त्यांना हे लज्जास्पद !

१६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ होणार

आता सरकारने देशात येत्या १६ जानेवारीपासून याच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात येणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात ३ कोटी नागरिकांना लस देणाची योजना आहे.

‘अ‍ॅमेझॉन’च्या ‘तांडव’ वेब सिरीजमधून हिंदूंचे नकारात्मक चित्रण

हिंदूंना भ्रष्ट आणि गुंड, तर मुसलमानाला दाखवले चांगले ! ‘अ‍ॅमेझॉन’कडून सातत्याने होणारा हिंदुद्वेष रोखण्यासाठी केंद्र सरकारने आतातरी त्याच्यावर बंदी घालावी आणि हिंदुद्वेष कायमचा थांबवावा !

बैठकीमध्ये शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात आरोप-प्रत्यारोप

कृषी कायदे रहित करण्यासाठी गेले दीड मास आंदोलन करत असलेले शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. यावर आता १५ जानेवारीला चर्चा होणार आहे.

विधीमंडळाच्या कार्यकाळात पक्षांतर करणार्‍या नेत्यांवर निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मागणी

अशी मागणी का करावी लागते ? निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांनीच ही बंदी घातली पाहिजे !

केंद्र सरकार गायीच्या उपयुक्ततेची माहिती देण्यासाठी प्रथमच राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेणार !

गायीचे दूध, गोमूत्र, शेण आदी गोष्टी मानवाला अत्यंत उपयुक्त आहेत; मात्र गायीचे कित्येक उपयोग आपल्याला आजही ठाऊक नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आता ‘राष्ट्रीय कामधेनू आयोगा’कडून राष्ट्रीय पातळीवर एक परीक्षा घेतली जाणार आहे.

केजरीवाल शासन देहली येथे कोकणी अकादमी स्थापन करणार

भारतातील विद्यार्थ्यांना भाषेसंबंधी ज्ञान मिळवण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने येथील केजरीवाल शासनाने देहलीमध्ये कोकणी अकादमी चालू करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. देहली मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

शेतकरी आंदोलनाची स्थिती तबलिगी जमातसारखी होऊ नये !  

न्यायालयाला अशी चिंता व्यक्त करावी लागते, याला पोलीस, प्रशासन आणि शेतकरी उत्तरदायी आहेत ! सामान्य लोकांकडून दंड वसूल करणारे प्रशासन आणि पोलीस येथे गांधी यांच्या माकडांप्रमाणे कृती करत आहेत, तसेच नियम भंग करणारे शेतकरीही जनताविरोधी कृती करत आहेत !

हिंदु राष्ट्राची संकल्पना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचवण्यासाठी धर्मप्रेमींनी प्रयत्न करावेत ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

राष्ट्र आणि धर्म यांच्या दृष्टीने सध्या आपत्काळ चालू आहे. वाढत्या नैसर्गिक आपत्ती, देशद्रोही आणि धर्मद्रोही यांचे वाढते बळ, राजकीय अस्थिरता, तसेच समाज, राष्ट्र अन् धर्म यांच्या कार्यात वाढत असलेल्या अडचणी ही सर्व आपत्काळाची भौतिक लक्षणे आहेत.

भारताने बनवली जगातली पहिली ‘रुग्णालय रेल्वे’ !

भारतीय रेल्वेने जगातील पहिली ‘रुग्णालय रेल्वे’ गाडी बनवली आहे. जगातील कोणत्याही देशात अद्याप अशाप्रकारची विशेष रेल्वे बनवण्यात आलेली नाही. या रेल्वेमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध असतील, तसेच अत्याधुनिक उपकरणे आणि डॉक्टरांचे पथक तैनात असेल.