देहली मंत्रीमंडळाकडून संमती
नवी देहली, ८ जानेवारी (वार्ता.) – भारतातील विद्यार्थ्यांना भाषेसंबंधी ज्ञान मिळवण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने येथील केजरीवाल शासनाने देहलीमध्ये कोकणी अकादमी चालू करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे. देहली मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या प्रस्तावाला संमती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. यामध्ये त्यांनी कोकणी भाषा बोलणारे आणि कोकणी भाषा आवडणारे या सर्वांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, याआधी देहली येथे तमिळ अकादमी स्थापन करण्यास शासनाने संमती दिली आहे. या वेळी अण्णा द्रमुक पक्षाचे नेते एम्.के.स्टॅलीन यांनी आनंद व्यक्त केला होता.’’
कोकणी अकादमी स्थापन करण्याच्या प्रस्तावाला संमती मिळाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या गोव्यातील नेत्या प्रीती शर्मा यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री केजरीवाल यांना धन्यवाद दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे, ‘‘देहली येथे रहाणार्या कोकणी भाषिकांसाठी ही चांगली बातमी आहे. कोकणी एक सुंदर भाषा आहे आणि त्या प्रदेशामध्ये रहाणार्या लोकांकडे एक समृद्ध वारसा आहे. याला देहली शासनाकडून प्रोत्साहन देण्यात आले आहे.’’