‘अ‍ॅमेझॉन’च्या ‘तांडव’ वेब सिरीजमधून हिंदूंचे नकारात्मक चित्रण

हिंदूंना भ्रष्ट आणि गुंड, तर मुसलमानाला दाखवले चांगले !

‘अ‍ॅमेझॉन’कडून सातत्याने होणारा हिंदुद्वेष रोखण्यासाठी केंद्र सरकारने आतातरी त्याच्यावर बंदी घालावी आणि हिंदुद्वेष कायमचा थांबवावा !

नवी देहली – अ‍ॅमेझॉनच्या ‘ओटीटी अ‍ॅप’वरून तांडव नावाची वेब सिरीज प्रदर्शित करण्यात येणार आहे. सध्या या वेब सिरीजची प्रसिद्धी एका विज्ञापनाद्वारे केली जात आहे. त्यातून हिंदूंचे नकारात्मक चित्रण करण्यात आले आहे, तर मुसलमानाला चांगले दाखवण्यात आले आहे.

Amazon Prime Video India

या विज्ञापनात अभिनेता सैफ अली खान यांना भ्रष्ट हिंदु नेता दाखवण्यात आले आहे. ते जानवे घालतात आणि चाणक्यनीतीच्या गोष्टी करतात, असे दाखवले आहे. यात एक पिवळ्या रंगाचा झेंडा दाखवण्यात आला असून त्यावर सूर्याचे चिन्ह आहे. यात एक नकारात्मक पात्रही दाखण्यात आले आहे. याचे नाव ‘शिवा’ ठेवण्यात आले असून तो कपाळावर टिळा लावतो. त्याला रागीट दाखवण्यात आले आहे. ही भूमिका झीशान अयुब साकारत आहेत. एक मुसलमान तरुणीही दाखवण्यात आली आहे. तिचे नाव सना असून ती दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधात लढतांना दाखवण्यात आली आहे.