भारताने बनवली जगातली पहिली ‘रुग्णालय रेल्वे’ !

रुग्णांवर होणार विनामूल्य उपचार !

नवी देहली – भारतीय रेल्वेने जगातील पहिली ‘रुग्णालय रेल्वे’ गाडी बनवली आहे. जगातील कोणत्याही देशात अद्याप अशाप्रकारची विशेष रेल्वे बनवण्यात आलेली नाही. या रेल्वेमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध असतील, तसेच अत्याधुनिक उपकरणे आणि डॉक्टरांचे पथक तैनात असेल. त्यामुळे या रेल्वेला ‘लाइफलाईन एक्स्प्रेस’ असे नाव देण्यात आले आहे. हे चालते फिरते रुग्णालय असणार आहे.

१. ही रेल्वे ७ डब्यांची असून यात २ अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, ५ ऑपरेटिंग टेबल आहेत. यांसह या रेल्वेमध्ये ‘मेडिकल स्टाफरूम’ही आहे.

२. सध्या ही रेल्वे आसामच्या बदरपूर रेल्वे स्थानकावर उभी आहे. या रेल्वेमध्ये कर्करोग, मोतीबिंदू अशा अनेक आजारांवर उपचार केले जात आहेत.