Prayagraj Kumbh Parva 2025 : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी १०८ यज्ञांचा संकल्प, कुंभमेळ्यात यागाला प्रारंभ !

प्रयागराज कुंभपर्व २०२५

पंडित गिरीधारी मिश्रा

प्रयागराज, २ फेब्रुवारी (वार्ता.) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला ईश्‍वराचा आशीर्वाद प्राप्त व्हावा, यासाठी राष्ट्रीय महाकाल सेनेचे (हरिद्वार) राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी आलोक गिरिजी महाराज यांनी १०८ यज्ञांचा संकल्प केला आहे. तीर्थराज प्रयाग येथील महाकुंभपर्वामध्ये या संकल्पाचा पहिला यज्ञ करण्यात येत आहे.

स्वामी आलोक गिरिजी महाराज यांची कुटी

सेक्टर १९ मध्ये शास्त्री पुलाच्या १४ व्या खांबाच्या येथे असलेल्या पंचायती श्री निरंजनी आखाड्याचे स्वामी आलोक गिरिजी यांच्या कुटीमध्ये या यज्ञ चालू आहे. या ठिकाणी कथा करण्यासाठी वाराणसी येथून आलेले पंडित गिरीधारी मिश्रा याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’ला माहिती देतांना म्हणाले, ‘‘नेपाळ एकमात्र हिंदु राष्ट्र होते; मात्र त्याला निधर्मी करण्यात आले. मुसलमांनांचे अनेक देश आहेत; मग भारत हिंदु राष्ट्र का होऊ नये. अनेक भाविक या यज्ञामध्ये सहभागी होत आहेत. दैवी शक्तीनेच आम्हाला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रेरणा दिली आहे. भारतामध्ये लवकरच घटनात्मकरित्या हिंदु राष्ट्राची स्थापना होईल. ’’