|
भांडुप – येथील कुख्यात गुंड झिया अन्सारी याने स्वतःवर नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांची कलमे लिहिलेला केक कापून वाढदिवस साजरा केला. या प्रकरणी त्याला तडीपार करण्याचा प्रस्ताव सिद्ध करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली आहे. त्याच्यावर ८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून जामिनावर बाहेर आला हाेता.
संपादकीय भूमिकागुन्ह्यांच्या कलमांचा केक कापून वाढदिवस साजरा करणार्या गुंडाचा जामीन त्वरित रहित करून त्याला पुन्हा कोठडीत डांबावे ! |