ओळख लपवण्यासाठी मजूर म्हणून कार्यरत !

ठाणे – बंगालमध्ये पत्नीसोबत अनैतिक संबंधातून २ तरुणांनी गोळ्या झाडून एकाची हत्या केली होती. या प्रकरणातील एका आरोपीला बंगाल पोलिसांनी अटक केली होती. दुसरा आरोपी सिराज शहा पसार झाला होता. तो डोंबिवली येथे लपून बसल्याची माहिती बंगाल पोलिसांनी स्थानिक पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. तो ओळख लपवण्यासाठी मजूर म्हणून डोंबिवली एम्.आय.डी.सी.मध्ये काम करत होता.
संपादकीय भूमिका :अशांना कठोर शिक्षाच करायला हवी ! |